सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल जवळील भिंगारी येथील कपल बारवर पोलिसांनी छापा टाकत सहा जणांविरोधात मंगळवारी (दि.24) गुन्हा दाखल केला. यात चार महिला सिंगर, बार मॅनेजर आणि एका पुरुष सिंगरचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 जून रोजी रात्री दहाच्या सुमारास कपल बार मध्ये महिला वेटर या अश्लील हावभाव करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रात्री अकराच्या सुमारास पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी चार महिला तोकडे कपडे परिधान करून ग्राहकांसमोर गाण्यावर नृत्य करत अश्लील हावभाव, बीभत्स चाळे व अंगविक्षेप करताना दिसून आल्या. तसेच बार मधील मॅनेजर व वेटर त्यांना प्रोत्साहित करत होते. पनवेल शहर पोलिसांनी चार महिला सिंगर, चेतन नारायण हेगडे मॅनेजर, बेतूअल्ला अब्दुल कलाम अन्सारी-सिंगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या पनवेल मधील कपल बारवर गेल्या पाच ते सात वर्षांमध्ये जवळपास सहा ते सात वेळा कारवाई करण्यात आली होती. या कपल बार वर सतत कारवाई होत असल्याने त्याचा परवाना कायमचा रद्द करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.







