इगतपुरीमध्ये रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा

चार अभिनेत्रींचा समावेश
I नाशिक I वृत्तसंस्था I
मुंबईपासून जवळच असलेल्या इगतपुरी येथे नाशिक ग्रामीण पोलिसांनी रेव्ह पार्टीवर धाड टाकली. इगतपुरीतील एका रिसॉर्टमध्ये ही रेव्ह पार्टी सुरु होती. या छापेमारीत चित्रपटसृष्टीत काम करणार्‍या चार महिलाही सहभागी झालेल्या होत्या. यात ङ्गबिग बॉसफमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेचाही समावेश आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील दोन बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या निर्देशाप्रमाणे बंगल्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी पहिला व पुरूष मादक द्रव्यासह नको त्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले. इगतपुरीमध्ये मानस रिसॉर्टच्या हद्दीत स्काय ताज विला या बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला होता. शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी टीमसोबत धाड टाकली. गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे ही कार्यवाही करण्यात आली.
बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याचं कारवाईनंतर उघड झालं. या रेव्ह पार्टीत चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणार्‍या चार महिलाही सहभागी झाल्याचं कारवाईनंतर स्पष्ट झालं. तसेच बिग बॉसफ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतलेल्या एका महिलेचाही समावेश आहे. 10 पुरुष आणि 12 महिलांसह एकूण 22 जणांना नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी ताब्यात घेतलं.

Exit mobile version