पोलिसांनी तीन महिन्यात उघड केले तीन खुनाचे गुन्हे

| पनवेल | वार्ताहर |

शहर ठाण्याच्या हद्दीत 30 वर्षा पूर्वीच्या तीन खुनाचे गुन्हे अवघ्या तीन महिन्यात विशेष मोहिमेअंतर्गत उघडकीस आणण्यात पनवेल पोलिसांना यश आले आहे. बिट्टूसिंग उर्फ अर्जुनसिंग, नगिना उर्फ चंक्कीपांडे सिद्धी कौल आणि राजू सिंगसानी या तीन आरोपीना ताब्यात घेतले आहे. बाऊसिंग हा तपासा दरम्यान मयत झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीस उपआयुक्त, परिमंडळ 02 पंकज डहाणे यांनी खून आणि अन्य गंभीर गुन्हयातील अभिलेखावरील फरारी तसेच पाहिजे आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्याकरिता विशेष मोहिम राबवण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे पोलीस पथक तयार करण्यात आले होते. पोलीस पथकांनी पोलीस ठाणेचे 30 वर्षे जुने अभिलेख पडताळले असता खून या शीर्षकाखाली तीन गुन्हे दाखल झाले होते. या गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. तिन्ही गुन्ह्यांतील पाहिजे असणारेे आरोपी मिर्झापूर (उत्तर प्रदेश), सिद्धीपेठ (तेलंगणा) आणि अमृतसर (पंजाब) या ठिकाणी आपले अस्तित्व लपवून राहत असल्याची माहिती पोलीसांना प्राप्त झाली. पोलीस पथकांनी स्थानिक पोलीस पथकांशी योग्य समन्वय साधून तिन्ही गुन्हयातील पाहिजे आरोपींचा शोध घेऊन त्यांना गुन्हयाचे अधिक तपासकामी ताब्यात घेतले आहे. यापैकी बाऊसिंग हा तपासादरम्यान मयत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

Exit mobile version