पाली शहरातून पोलिसांचे रूट मार्च !

| पाली | वार्ताहर |

लोकसभा निवडणुका, आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सवांच्या काळात सुधागड तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता, सुव्यवस्था कायम राहावी तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, या उद्देशाने जिल्हा पोलिस अधीक्षक सौमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार व पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सरिता चव्हाण, यांचे नेतृत्वाखाली पाली शहरातून पोलिसांचे बुधवारी (दि.10) सायंकाळी 5.30 वाजता पथसंचलन करण्यात आले.

संचलनात पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, नागोठणे सहायक पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलिस उपनिरीक्षक चौधरी, पोलिस उपनिरीक्षक गच्चे, यांच्यासह माणगाव येथील दंगल नियंत्रण पथक तसेच पाली, रोहा, कोलाड आणि नागोठणे येथील पोलिस पथकासह सुमारे 45 महिला व पुरुष पोलीस अंमलदार या पथसंचलनात सहभागी झाले होते. सदर रूट मार्च हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती हे सण उत्सव शांततेत पार पाडण्याच्या अनुषंगाने घेण्यात आले होते.

Exit mobile version