नागोठण्यात पोलिसांचा रूट मार्च

। नागोठणे । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक मतदान प्रक्रिया येत्या 7 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.4) सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजण्याच्या दरम्यान नागोठणे पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाकडून रूट मार्च घेण्यात आला. नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील नुक्कड गल्ली, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोळीवाडा, हुजरा मोहल्ला, के.एम.जी. विभाग, खुमाचा नाका, बाजारपेठ व परिसरात हा रूट मार्च घेण्यात आला. या रूट मार्चमध्ये दोन पोलीस अधिकारी, 40 पोलीस अंमलदार, 30 होमगार्ड यांनी सहभाग घेतला होता. हा रूट मार्च यशस्वी करण्यासाठी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेश थळकर व पोलीस कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version