वडखळ पोलिसांनी पकडला गांजा, दोघांना अटक

1 किलो 600 ग्राम गांजा जप्त, अंदाजे 19 हजार 200 रुपये किंमत
पेण तालुक्यातील वडखळ पोलिसांनी आज बुधवार रोजी दुपारी कर्जत गौळ वाडी येथील 23 वर्षाच्या दोघांना गांजा घेऊन जात असताना सापळा लावून अटक केली. त्यांच्याकडे 1 किलो 600 ग्राम वजनाचा अंदाजे 19 हजार 200 रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

मुबई-गोवा महामार्गावरील वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोलवी गावानजीक कर्जत येथील दोन इसम मोटारसायकलवर गांजा विक्री करण्यासाठी येत असल्याच्या मिळालेल्या माहितीनुसार वडखळ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार उपनिरीक्षक भोर, सा फौ.पाटील, पो हवा.रुईकर, दिनेश भोईर, अमोल म्हात्रे, राहुल पाटील यांच्या पथकाने सापळा रचून दोन आरोपींना गांजासहित अटक केली आहे. सदर प्रकरणी वडखळ पोलिसांकडून रात्री उशिरा पर्यंत अधिक तपास सुरू होता.

Exit mobile version