। नेरळ । प्रतिनिधी ।
गणेशोत्सव काही दिवसांवर येवून ठेपला असून ईद तसेच पर्युषण पर्व आदी सण येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे नियोजन केले असून नेरळ पोलिसांनी शक्तीप्रदर्शन केले.
सणांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सर्व धर्मियांचे सण उत्साहात पार पडले जावेत यासाठी पोलिसांकडून शांतता सभा आयोजित केल्या जात आहेत.त्याचवेळी पोलीस दलाकडे असलेल्या सर्व यंत्रणा यांची माहिती जनतेला व्हावी आणि जनता आपल्या भागातील कायदा सुव्यवस्था यांच्यादृष्टीने निर्धास्त असावी यासाठी शक्तीप्रदर्शन पोलिसांकडून करण्यात आले.
नेरळ पोलीस ठाणे येथून निघालेले हे शक्ती प्रदर्शन कल्याण कर्जत रस्त्याने नेरळ गणेश घाट येथून ग्रामपंचायत कार्यालय असे आले.तेथून कुसुमेश्वर मंदिर असे मारुती मंदिर येथून टिळक चौकातून माथेरान नेरळ रस्त्याने बाजारपेठ मार्गे हुतात्मा हिराजी पाटील चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,हुतात्मा भाई कोतवाल चौक असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गे टॅक्सी स्टँड येथून नेरळ खांडा गावातून पुन्हा नेरळ पोलीस ठाणे येथे पोहचले.