पोलीसांनी रोखला बालविवाह

। सांगोला । प्रतिनिधी ।
मौजे पाचेगाव खुर्द ता. सांगोला येथे होणार बालविवाह सांगोला पोलीसांनी तात्काळ तत्परता दाखवत होऊ घातलेला विवाह रोखला. सदर दोन्ही कुटुंबाला बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देऊन त्यांना समज देऊन मनपरिवर्तन केले. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस ठाण्यात असताना माहिती मिळाली की मौजे पाचेगाव खुर्द ता. सांगोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ अल्पवयीन मुलगीचा विवाह साखरपुडयात करीत आहेत, अशी बातमी दिल्याने स.पो.नि काटकर आणि सहकारी बालविवाह रोखण्यासाठी मौजे पाचेगाव येथे गेले. तेथे साखरपुडयाचा कार्यक्रम चालू होता व विवाहसदृश्य परिस्थिती पोलीसांना दिसून आली.

तेथे हजर असलेल्या मुलीचे नातेवाईकांना तीचे जन्म तारखेचे पुराव्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी पुरावा देण्यास असमर्थता दर्शविली. म्हणून पोलीसांनी मुलीचे शिक्षणाबाबत विचारून शाळेचे नाव विचारले असता तीने शाळेचे नाव कै. दत्तात्रय चौगुले विदयालय यलमार मंगेवाडी ता. सांगोला येथे इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असल्याचे सांगीतले. पो. नि. अनंत कुलकर्णी तसेच बाल संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण, सरपंच रामचंद्र मिसाळ गावातील प्रतिष्ठत लोकांचे समुउपदेशन करून त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायदयातील तरतुदीची माहिती देवून त्यांचे मन परिवर्तन झालेनंतर त्यांचे तसे लेखी जबाब व स्टॅम्प समझ घेवुन पुन्हा परत पाठविले आहे,अशी माहिती सांगोला पोलीसांनी दिली.

Exit mobile version