| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पाेलीस उपनिरीक्षक दारासिंग पावरा यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघातात आज मृत्यू झाला. अलिबाग-नेहुली येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदरचा अपघात झाला. पावरा हे 55 वर्षाचे हाेते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दाेन मुले, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात अपघाती निधनाने परिवारासह पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.
पावरा हे अलिबाग मुख्यालयात कार्यरत हाेते. आज सायंकाळी ते अलिबागकडून पाेयनाडकडे मोटार सायकलवर जात हाेते. नेहुली येथे अज्ञात वाहनाची धडक लागली. त्यानंतर त्यांना अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषीत केले. पावरा हे मुळ नंदुरबार जिल्ह्यातील ढवळीविहीर गावातील आहेत. रायगड जिल्हा पोलीस दलात त्यांनी सुमारे 35 वर्ष सेवा बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.