मुलांची तस्करी रोखण्यात पोलीसांना यश

। नेरळ । वार्ताहर ।
मध्य रेल्वे पोलिसांच्या सोबत असलेल्या होमगार्ड यांच्या सतर्कतेमुळे नेरळच्या निर्माण नगरी भागातील चार मुलांची तस्करी टळली आहे. चारही मुलांनी आरडाओरड केल्याने रेल्वे पोलिसांच्या नाकाबंदीवर असलेल्या पोलीस, होमगार्ड यांनी त्यातील महिलांना पकडण्यासाठी झडप टाकून पकडण्याचा प्रयत्न करून एका महिलेला पकडण्यात यश आले असून अन्य दोन महिला मात्र पळून गेल्या आहेत. नेरळ रेल्वे स्थानकात फलाट एकच्या बाजूला निर्माण नगरी हि वस्ती आहे. त्या भागातील मुले तेथे खेळात असताना सायंकाळी सहा वाजता काही मुलांचा आरडाओरड ऐकायला मिळाली. त्यावेळी फलाट एक वर गस्तीवर असलेल्या चार मुलांची पळापळ पाहून स्टेशनवर गस्ती करीत असलेल्या रेल्वे पोलीस आणि होमगार्ड यांनी धावत जाऊन आरोपीना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथून अंधाराचा फायदा घेऊन दोन महिला पसार झाल्या. मात्र मुलांना हाताला धरून नेणार्‍या त्या महिलांनी मुलांना सोडून पाळण्याचा प्रयत्न केला.


तीन अनोळखी महिला या चार मुलांना हाताला धरून नेट होत्या. त्यावेळी दोन मुलांनी त्या महिलांचे हात झटकून आरडाओरड केल्याने त्या चाही मुलांची तस्करी रोखली गेली आहे. निर्माण नगरी भागातील दक्ष विक्रम नैय्या,दिशा विक्रम नैय्या आणि खेळात असलेल्या दोन मुली यांची तस्करी टळली आहे. नेरळ रेल्वे पोलिसांनी मुलांच्या तस्करीचा प्रयत्न करणार्‍या राजस्थान येथील कुसुम अशोक अहिर-25 या महिलेला ताब्यात घेतले. त्यावेळी रेल्वे पोलिसांच्या पथकात सहायक पोलीस निरीक्षक अतुल ठोंबरे, पोलीस कर्मचारी म्हस्के, देशमुख, सातपुते तसेच होमगार्ड म्हात्रे, सिंधू म्हात्रे, यांनी त्या मुलांची तस्करी रोखण्यात यश मिळविले.

Exit mobile version