हबीब खोतला पकडण्यास पोलीस असमर्थ

| पेण | प्रतिनिधी |
पेण येथील मुद्रांक विक्रेते तसेच पुनम गुप्ता फसवणूक प्रकरणातील आरोपी हबीब खोत यांना पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. पेण तालुक्यातील जनतेच्या नजरेस तो येत असताना पोलीस त्याला का पकडू शकत नाहीत, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की, या गुन्हयातील फिर्यादी अकील पठाण याने हसिबुर रहमान याला आंबेघर येथील सर्व्हे नं. 210 च्या खरेदीसाठी 20 हजार रुपये दिले होते. जमिन व्यवहार करण्यासाठी हबीब खोत याने तांबडशेत येथील सर्व्हे नं 2/5 मिळकतीच्या सातबाऱ्यावर हसिबुर रहमान याचे नाव लिहून नकली सातबारा खरेदीखतासाठी लावण्यास दिला होता. त्याच्या आधारे हसिबुर रहमान याने आंबेघर येथील जमिनीचा व्यवहार करुन फसवणूक केली.

याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हसिबुर रहमान याला ताब्यात घेतले आहे. मात्र हबीब खोत हा पेण शहरात खुलेआत फिरत असतानाही पोलीस त्यास पकडण्यास असमर्थ ठरीत आहेत.

युध्द पातळीवर शोधमोहिम
हबीब खोत यांची शोधमोहिम सुरू ठेवली आहे. गुप्त बातमीदार देखील जागोजाग ठेवले आहेत. न्यायालयाच्या बाहेर देखील त्याला ताब्यात घेण्याच्या दृष्टिने सापळा रचला होता. परंतु तो तेथे आला नाही. हा तपास आता मोहिते साहेबांकडे दिला आहे. लवकरच हबीब खोत याला अटक करू.

आर.आर.भोर, पोलिस उपनिरीक्षक
Exit mobile version