कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची कसरत

| कोलाड | प्रतिनिधी |

सलगच्या तीन सुट्ट्या आल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन मुंबई, ठाणे, तसेच पुणे येथून असंख्य पर्यटक कोकणात निघाले आहेत. परंतु, खांब-कोलाड येथील रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे प्रवासी वर्गाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा वाहतूक कोंडीचा तिढा केव्हा सुटणार, असा सवाल प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोलाड पोलिसांकडून शर्थिचे प्रयत्न सुरु आहेत.

शनिवार, रविवार, तसेच सोमवारी 26 जानेवारीची सुट्टी असल्यामुळे आल्हाददायक थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक तसेच चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरुन सार्वजनिक व खासगी वाहनांनी कोकणात निघाले आहेत. परंतु, मुंबई-गोवा महामार्गावरील खांब-कोलाड येथील रस्त्यांच्या अपूर्ण कामांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कोलाड येथे उड्डाणपुलाचे काम सुरु असून पुलाच्या बाजूला सर्व्हिस रोडचे ही काम सुरु आहे. तसेच, खांब येथील पुलाचे काम सुरु असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. कोलाड सहाय्यक पोलीस निरिक्ष्सक नितीन मोहिते यांच्यासह पोलीस कर्मचारी व वाहतूक पोलीस जागोजागी उभे राहून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करीत आहेत.

Exit mobile version