किनाऱ्यावर पोलिसांची करडी नजर

| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |

पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे मुरुड किनारा हाऊसफुल्ल झाला आहे. दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत असल्याने गर्दीने तर उच्चांक गाठला आहे. वाहतुकीची कोंडी, टोल नाक्यावरील गर्दी, पार्किंगसाठी वाहनांच्या रांगा आदी प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. समुद्रात पोहणार्‍यांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. पालिकेकडून दिवसातून तीनदा किनार्‍याची स्वच्छता करण्यात येत आहे. किनार्‍यावर कांदाभजी, भुट्टा, नॉनव्हेज, वडा-पाव खात-खात पर्यटक आनंद घेत आहेत. किनारा सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने पार्किंगची जागा वापरता येत नाही. त्यामुळे वाहने वाळूत उभी करण्यात येत आहेत. शाळेच्या सहली मोठ्या प्रमाणात असल्याने किनारे पर्यटकांनी फुल्ल झालेत.

Exit mobile version