रोहा शिंदे गटात राजकीय भूकंप

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

उमेदवारी नाकारल्याने तालुका प्रमुख मनोज शिंदेंचा तडकाफडकी राजीनामा

| रोहा | प्रतिनिधी |

शिवसेना (शिंदे गट) रोहा तालुक्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून, तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. उमेदवारी नाकारल्याने आपला अपमान झाल्याची भावना व्यक्त करत त्यांनी पक्षातील ‌‘हम करेसो’ आणि एकाधिकारशाही निर्णयप्रक्रियेवर थेट आरोप केला आहे. हा राजीनामा त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे सुपूर्द केला.

गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम करत रोहा तालुक्यात संघटन मजबूत करण्यात मोलाचे योगदान दिल्यानंतरही स्थानिक कार्यकर्त्यांचे मत डावलले जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. तळागाळातील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता वरून निर्णय लादले जात असतील, तर अशा पदाला अर्थ उरत नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

या राजीनाम्यानंतर रोहा तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली असून, अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा शिवसेनेसाठी मोठा धक्का ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या घडामोडींवर आमदार महेंद्र दळवी किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या राजीनाम्यामुळे रोहा तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले असून, पुढील काळात आणखी धक्कादायक घडामोडी होण्याची शक्यता नाकारता

Exit mobile version