| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुका शिवसेनेचे सलग नऊ वर्षांपासून तालुका प्रमुख पदाची धुरा सांभाळनार्या मिलिंद देशमुख यांनी मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला आहे, जल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना सुधागड तालुका प्रमुख पदाची धुरा कुणाच्या खांद्यावर येणार? याकडे सार्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मिलिंद देशमुख यांनी सुधागड तालुका शिवसेना प्रमुख पदावरून काम करताना पक्षसंघटना वाढीसाठी तन मन धनाने योगदान दिले होते. जनतेचे विविध प्रश्न व समस्यांना न्याय देण्याची भूमिका बजावली होती. शिवसेनेतून अनेक सहकारी इतर पक्षात सोडून गेले तरी त्यांनी मात्र सुधागड शिवसेनेचा गड प्रामाणिकपणे व भक्कमपणे सांभाळला होता. त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने पाली सुधागड सह जिल्ह्यात चर्चेचे गुर्हाळ उठले आहे.
मिलिंद देशमुख यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सार्यांचे लक्ष लागले असून ते शिवसेनेत पुढेही निष्ठेने राहतील की अन्य राजकीय भूमिका स्वीकारतील हीच चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे. दरम्यान मिलिंद देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी त्यांच्या राजीनाम्यानंतर चर्चांच गुर्हाळ उठलं आहे. देशमुख आपली पुढील राजकीय भूमिका काय घेणार? ते शिवसेनेत राहणार की सत्ताधारी शिंदे गटात जाणार ?अशा चर्चांना देखील तालुक्यात उधाण आलेय.