• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

खेळाचं राजकारण

Varsha Mehata by Varsha Mehata
October 28, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राजकारणाचा पोरखेळ झालाय असं अनेकांना वाटतं. बरोबरच आहे. आमच्याकडच्या मशालीनं गद्दारी जाळून टाकू किंवा आमच्याकडची ढाल-तलवार म्हणजे महाराजांचा आशीर्वाद आहे अशी पोरासोरांसारखी भांडणं करणं याला दुसरं काय म्हणणार? सध्या महाराष्ट्रात हेच तर घडतंय. पण भांडणारी पोरं नंतर क्षणात एक होतात. गळ्यात गळे घालतात. तेही घडतं आहेच. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व भांडणारी आणि एकमेकांचे गळे पकडणारी मुलं एकत्र आलेली दिसली. अध्यक्षपदाच्या लढतीत संदीप पाटील यांना हरवण्यासाठी अमोल काळे यांना उभं करण्यात आलं. काळे हे नागपूरचे असून विद्युत कंत्राटदार, बिल्डर, आयटी कंपनीचे मालक इत्यादी बरेच काही आहेत. एक नक्की की ते क्रिकेटवाले नाहीत. क्रिकेटशी त्यांचा काहीही संबंध नाही.देवेंद्र फडणवीसांचे मित्र असल्याचा त्यांना फायदा झाला. जसा त्यांचे वडिल किशोर काळ यांना अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी चांगले संबंध असल्याचा झाला होता. फडणवीस मुख्यमंत्री कंत्राटदार आणि सरकारी कामांचे इच्छुक हे काळे यांच्या घरीच गर्दी करीत असत. काळे हे देवेंद्रांसाठी काय काय कामे करतात याचा यावरून अंदाज यावा. नागपूरच्या रस्त्यांवर एलईडी बसवण्याचं कंत्राट त्यांना मिळालं होतं. त्यावरून बरेच आरोप झाले होते. अशा पार्श्‍वभूमीच्या माणसाला पाठिंबा द्यायला शरद पवार, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे एकत्र आले. आशिष शेलार यांना बीसीसीआयचे खजिनदार करण्याला त्यांनी पाठिंबा दिला. त्यासाठी एक सर्वपक्षीय जंगी मेजवानी झाली. तिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही हजर होते. पवार-शेलार गट हा मुंबई क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जाईल असा आशीर्वाद त्यांनी दिला. शेलार हे एरवी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर कोणत्याही पातळीवर जाऊन टीका करीत असतात. त्यावेळी असं वाटतं की पवार हे शेलार यांचं तोडंही कधी पाहणार नाहीत. खालच्या स्तरावर या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते या टीकेमुळे एकमेकांशी शत्रुत्व घेतात. घराघरात भांडणं होतात. नाती तुटतात. डोकी फुटत नाहीत इतकंच. पण तिकडे मुंबईत मात्र शेलार आणि पवार हे कितीतरी वर्षांचे मित्र असल्यासारखे वागू लागतात. किंबहुना ते कधी खरंच शत्रू होते का असा प्रश्‍न पडतो. खेळात राजकारण आणू नका असं हे नेते वारंवार सांगतात. पण ‘मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक’ यातला क्रिकेट हा एकमेव शब्द फक्त खेळाशी संबंधित आहे. बाकी सगळं राजकारणच आहे. कोणतीही निवडणूक ही राजकीय असते. ही तर जगातील एका अतिश्रीमंत खेळाशी संबंधित अतिश्रीमंत संघटनेची निवडणूक होती. त्यात शेकडो कोटींची कंत्राटे, प्रसिद्धीचा झगमगाट, मोठ्या वर्तुळात सत्ता गाजवण्याची संधी सर्व काही आहे. क्रिकेट संघटनेमध्ये राजकारण्यांना पदं देऊ नका असं लोढा समितीनं सांगितलं होतं. ते काही वर्ष पाळलं गेलं. पण ते या ना त्या मार्गाने धाब्यावर बसवण्यात आलं. बीसीसीआयच्या सरचिटणीसदी अमित शाह यांचे चिरंजीव जय आहेत. सध्या भारतीय क्रिकेटची सर्व सूत्रे त्यांच्याच हाती आहेत. अलिकडे सौरव गांगुली यांना पुन्हा अध्यक्ष न करण्याचा जो निर्णय झाला त्याची बैठक अमित शाह यांच्या घरीच झाली होती. पवार यांनी सत्तेची ही पावले ओळखली आहेत. पवारांच्या राजकीय अनुभवाइतकं ज्यांचं वय असेल अशा आशिष शेलारांच्या मागे महाराष्ट्राच्या जाणत्या राजाची ताकद निमूटपणे उभी राहते ही घटनाच पुरेशी बोलकी आहे. तिकडे जय शहा यांच्या जोडीने काँग्रेसचे राजीव शुक्ला हेही ठळकपणे वावरतात हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे. ज्या पवारांना बारामतीतून उखडून टाकण्याचा भाजपने जाहीर इशारा दिला आहे आणि त्यांच्या नबाब मलिक, अनिल देशमुख इत्यादींविरुध्द ईडी लावली आहे ते खरे की देवेंद्रांचे पवारांसोबतच्या गुफ्तगूचे राजकारण खरे असा प्रश्‍न कार्यकर्त्यांनी या दोन्ही नेत्यांना विचारायला हवा. कवी गजानन माधव मुक्तिबोध यांनी पार्टनर तेरा पॉलिटिक्स क्या है असा प्रश्‍न एका कवितेतून विचारला होता. लोकांना मूर्ख समजणार्‍या राजकारण्यांना आता हाच प्रश्‍न विचारण्याची वेळ आली आहे.    

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

तीन महिन्यात चार मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर

Next Post

‘ओला दुष्काळ’च्या मागणीच्या निमित्ताने

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post

‘ओला दुष्काळ’च्या मागणीच्या निमित्ताने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?