पंजाब,गोवा,उत्तराखंडमध्ये उद्या मतदान

नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पंजाब,गोवा,उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (14 फेब्रुवारी) एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.तर उत्तरप्रदेशमध्ये दुसर्‍या टप्प्यासाठी निवडणूक होणार आहे.चार राज्यात मिळून 282 जागांसाठी हे मतदान घेतले जाणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गोव्यात 40 जागांसाठी एकाच टप्प्यात सोमवारी मतदान होत असल्याने येथे निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. 301 उमदेवार रिंगणात आहेत. पंजाबमध्ये 117,उत्तराखंडमध्ये 70 तर उत्तरप्रदेशातील 55 जागांवर हे मतदान घेतले जाणार आहे.

प्रचाराचा कालावधी वाढलाकोरोनाचा संसर्ग आता काहीसा कमी झाल्यानं निवडणूक आयोगानं पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. विशेष म्हणजे नव्या नियमावलीनुसार आता पदयात्रांनाही परवानगी देण्यात आली आहे. पण यासाठी काही अटी-शर्तींचं पालन करावं लागणार आहे.
याशिवाय राजकीय पक्षांना कोणत्याही मैदानात किंवा सभांमध्ये जास्तीत जास्त 50 टक्के किंवा कोविडच्या नियमांनुसार सभा घेता येईल. पदयात्रा देखील ठरवून दिलेल्या संख्येनंच निघेल. यासाठी जिल्हाधिकार्‍यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल तसेच निवडणुकीशी संबंधित इतर नियमांचंही पालन करावं लागेल.

Exit mobile version