रायगडातील सहा नगरपंचायतींमध्ये उद्या मतदान

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा अनारक्षित करून घेण्यात येत असलेल्या सर्वसाधारण प्रवर्गांसाठी होणार्‍या निवडणूकीसाठी जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींमध्ये उद्या मंगळवार दिनांक 18 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

6 नगरपंचयातींच्या 21 जागांसाठी 60 उमेदवार निवडणूकीच्या आखाड्यात एकमेकांविरोधात आपले नशिब आजमावत आहेत. सहा पैकी खालापूर नगरपंचायतीच्या एका जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात असल्याने त्यांच्यात सरळ लढत होईल. माणगावसाठी 4 प्रभागातील 4 जागांसाठी 10 उमेदवारांमध्ये निवडणूक रिंगणात लढत रंगणार आहे. म्हसळा नगरपंचायतीसाठी रिंगणात 8 उमेदवार लढा देत आहेत. पोलादपूरात चार प्रभागातून 16 उमेदवार चार जागांसाठी लढत आहेत. तळा नगरपंचायतीच्या 4 जागांसाठी 14 जणांमध्ये लढत रंगणार आहे. पालीत 14 उमेदवारांमध्ये 4 जागांसाठी लढाई होईल. या जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होईल. त्यानंतर 19 जानेवारी रोजी त्याचा निकाल जाहीर केला जाईल.

Exit mobile version