पोंढ्याची वाडी अंगणवाडी नादुरुस्त

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायतमधील पोंढ्याची वाडी अंगणवाडी केंद्र नादुरुस्त झाली आहे. त्या ठिकाणी अंगणवाडी केंद्र आहे कि कोंडवाडा, असा प्रश्‍न स्थानिक आदिवासी लोकांनी कर्जत पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन केला आहे.

अंगणवाडी केंद्र नादुरुस्त असल्याने 70 बालकांनी बसायचे कुठे, केंद्राची वास्तू चारही बाजूंनी ढासळत चालली आहे. कधीही कोसळू शकेल. तसेच, खिडक्या कोसळून गेल्या आहेत, जेवण बनविण्याचे किचन शेड जागेत जागा नाही. मग पोषण आहार कुठे बनवायचा, असा प्रश्‍न आदिवासी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. येथील अंगणवाडी सेविका कल्पना ठोंबरे यांनी ग्रामसेवकांना भेटून त्यांना अंगणवाडी केंद्राच्या दुरवस्थेबद्दल सांगण्यात आले आहे. त्यांना फोटोदेखील पाटवले आहेत. परंतु, ग्रामपंचायतीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत.

Exit mobile version