पूजा खेडकरची उमेदवारी रद्द

यूपीएससीचा मोठा निर्णय

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असणाऱ्या पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीने अखेर रद्द केली आहे. आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली कथित अनियमितता या पार्श्वभूमीवर उमेदवारी रद्द केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, यापुढे यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, असंही यूपीएससीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे यूपाएससीनं त्यांच्यावर ही कारवाई केलेली असताना, दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप पतियाला कोर्टानं निर्णय दिलेला नाही.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्याचा ठपका पूजा खेडकर यांच्यावर आधी ठेवण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. पुढे पूजा खेडकर यांनी सनदी सेवेत निवड होताना त्यांच्या दिव्यंगत्वाबाबत चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप करण्यात आला. शिवाय, त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही त्यांनी ओबीसी क्रिमी लेअर सुविधेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, यासाठी त्यांनी परीक्षेसाठी अर्ज करताना नावामध्येही वारंवार बदल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी याचबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा उल्लेख न्यायालयातील सुनावणीमध्ये करण्यात आला.

पूजा खेडकर यांनी सनदी सेवेत निवड होताना चुकीची कागदपत्रं सादर केली होती, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यात त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही त्यांनी क्रीमिलेअर प्रमाणपत्राचा फायदा घेऊन आयएएस पद पदरात पाडून घेतल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, त्यांनी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रामध्येही अनियमितता असल्याचा दावा न्यायालयातील सुनावणीदरम्यान करण्यात आला आहे.

Exit mobile version