आपटा येथे महावितरणचा भोंगळ कारभार

| आपटा | वार्ताहर |
आपटा येथे महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ऐन पावसाळ्यात आपटा, गुळसुंदे, तुराडे, वावेघर, लाडीवली या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती घेतली असता, लाईनमन कमी आहे त व काही लाइनमन त्यांच्या कामाच्या ठिकाणी राहात नाहीत, असे सांगण्यात आले. जर काही ठिकाणी तातडीचे काम निघाले, तर कोणी जागेवर उपलब्ध होत नाहीत. या भागातील वीज मंडळाचे अधिकारी जागेवर भेटत नाहीत. ऑफिसमध्ये नसल्याने अनेक वेळा वेळ व फेरी फुकट जाते. येथे अधिकारी नेहमी कामाच्या ठिकाणी राहिले पाहिजे व भेटले पाहिजेत, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

या विभागातील जनतेच्या होणार्‍या गैरसोयीकडे महावितणच्या अधिकार्‍यांनी तात्काळ लक्ष घालून समस्था सोडविणे गरजेचे आहे. तसेच याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीर गोष्टीची दखल घेत व ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी जनतेतून होत आहे. अधिकारी व लाइनमन वायरमन यांनी कामाच्या ठिकाणी राहिले पाहिजेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Exit mobile version