। नविन पनवेल । वार्ताहर ।
नविन पनवेल सेक्टर 14 मधील होल्डिंग पाण्डची (बंधारा तलावची) दुरवस्था झाली आहे .या ठिकाणी साचलेल्या कचर्यामुळे तसेच वाढलेल्या झाडेझुडपामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
येथिल बाजूच्या सिडको उद्यानात लहानमुले तसेच ज्येष्ठ नागरिक येत असतात. त्यामुळे यांच्या आरोग्यास हानी पोहोचू शकते. सिडकोने लाखो रुपये खर्च करुन होल्डिंग पाण्डभोवती सुशोभिकरण करुन त्या ठिकाणी जॉगिंग ट्रकसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र पनवेल महापालिकेला त्याची स्वच्छता ही ठेवता येत नाही. या परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले असल्याने या परिसरात तळीरामांचा वावर वाढलेला दिसत आहे. या परिसरात विद्युत व्यवस्था नसल्यामुळे तसेच अस्वच्छता असल्यामुळे रात्रीच्या वेळेस भिकारी, गर्दुल्ले बसलेले दिसून येतात. यामुळे येथिल महिलांचा सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.