खालापूर तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था; केळवली मार्गे बीडखुद-खरवई मार्गावर खड्डेच खड्डे

पावसाळ्यात प्रवास करणे धोकादायक
। पाताळगंगा । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील बहुतांशी ग्रामीण भागातील काही रस्त्याची अवस्था इतकी बिकट बनली आहे, त्यामुळे वाहन चालकांसह पादचारी प्रवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील केळवली रेल्वे स्टेशन मार्गे वणी – बीड – जांबरुंग – खरवई रस्ता मोठ्या प्रमाणावर खड्ड्याच्या विळख्यात सापडल्याने खड्ड्याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला करावा लागत असून मार्गावरील काही मोर्‍यांना मोठे भगदाड पडले आहे.
खालापूर तालुक्यातील काही भागातील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मरस्त्यात खड्डे की , खड्ड्यात रस्तेफ अशी स्थिती बनली असल्याने नागरिकांबरोबर वाहन चालकामध्ये कमालीचा संताप व्यक्त होत दररोज कुठेना कुठे तरी छोटे – मोठे अपघात घडत असून दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्यावरील खड्डे व नादुरुस्त मोर्‍या वाहन चालकांसह प्रवासी वर्गाला अनेक शारीरिक आजार होत असून काहीना कंबरदुखी, मानदुखी असे आजार जडत असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्याच्यामध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.
या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या मार्गावरुन अनेक शाळकरी विद्यार्थी व नागरिक, चाकरमानी दररोज प्रवास करीत असल्याने या मार्गावर मोठी वर्दळ पाहायला मिळत असल्यामुळे या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊन मोटार सायकल चालकाच्या गाड्या या रस्त्यावरून घसरून वाहन चालकांना दुखापत होत असल्याने त्याच्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

Exit mobile version