वालवट शेखाडी रस्त्याची दुरवस्था; स्थानिक हैराण

खड्डयातील रस्ता शोधताना वाहनचालकांची कसरत
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन दिवेआगर मार्गावरील वालवट ते शेखाडी ह्या चार कि.मी. रस्त्याची दयनीय अवस्था झाली असुन वाहनचालकांना खड्डयातील रस्ता शोधताना मोठी कसरत करावी लागतं आहे. श्रीवर्धन व दिवेआगर पर्यटन स्थळे असून या मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची ये जा सुरू असते.खड्डा चुकवतांना पर्यटकाच्या वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाळा काही दिवसावर आला असून दुरावस्था झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण होतं नसल्यामुळे स्थानिक वाहनचालकांमधे नाराजी पसरली आहे.

काही वर्षे वालवट शेखाडी रस्ता खड्डेमय व खड्डयांतील खडी रस्त्यावर पसरलेल्या अवस्थेत आहे. ह्याच रस्त्यावरून खासदार सुनीलजी तटकरे,पालकमंत्री आदितीताई तटकरे यांचे सभा, भूमिपूजन, उध्दाटन सोहळ्यांसाठी दौरे होत असतात. ह्या रस्त्याची दयनीय अवस्था खासदार, पालकमंत्री यांच्या निदर्शनास आली नाही का? राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी वालवट शेखाडी रस्त्या बाबतीत गप्प का आहेत.असा सुर स्थानिकांकडून ऐकावयास मिळतो. एकीकडे श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर येथील पर्यटक पर्यटन वाढावे ह्या दृष्टीने खासदार,पालकमंत्री सभांमधून उपक्रमांच्या नियोजना बद्दल बोलतं असतात. परंतु,रस्ते व्यवस्थित असले तरच पर्यटकांचे पाय कोकणाकडे वळतील.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सहा महिन्यापूर्वी वालवट शेखाडी रस्त्याबद्दल निवेदन दिल आहे. आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे. पावसाळ्या अगोदर रस्त्याचे डांबरीकरण झालं नाही तर आम्ही स्थानिक रस्ता रोको करू.

– अन्वर अली उंड्रे, भा.ज.प.तालुका उपाध्यक्ष, वालवट

रस्त्याची निविदा निघाली आहे. वर्क आऊट प्रोसेस मधे आहे. पावसाळा झाल्यानंतर लगेच वालवट शेखाडी रस्त्याचे काम सुरू होईल. – प्रसन्नजीत राऊत. उपविभागीय अभियंता.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग.श्रीवर्धन
Exit mobile version