कोमसापतर्फे पेणमध्ये पोपटी काव्य संमेलन

| पेण | वार्ताहर |
कोकण मराठी साहित्य परिषद पेण शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेले पोपटी कवी संमेलन विविधांगी कवितांनी फारच चवदार झाले. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी त्यांनी आगरी बोलीतील इवान ही खळखळून हसविणारी कविता सादर केली.शाखेचे अध्यक्ष लवेंद्र मोकल यांनी स्वागत आणि एस.एस.पाटील यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सुरेख सूत्र संचालन प्रसाद ठाकूर यांनी केले. सरपंच सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, मोहन भोईर,मल्हार चनलचे मिलिंद खारपाटील,कैलास पिंगळे,मच्छिंद्र म्हात्रे,म.वा.म्हात्रे सविता पाटील,सदानंद ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कविसंमेलनात सामाजिक, राजकीय कवितांनी फारच उंची गाठली.तर अंधश्रधा,दारू विषया वरच्या कवितांनी छान प्रबोधन केले,निसर्ग,वैचारिक कवितांनी वातावरण प्रसन्न केले.कवी रामचंद्र म्हात्रे,मोहनलाल म्हात्रे,रामनाथ पेंटर,शिवाजी पाटील,मोहन पाटील,मंदाकिनी हांडे,अनंत पाटील,गणपत म्हात्रे, प्रसाद फके,रमेश पाटील,नरेश अंबाजी,पुंडलिक म्हात्रे,दीनानाथ पाटील,गणपत म्हात्रे,जनार्दन पाटील,हिरामण पाटील,यशवंत बळावली,जी.एच.ठाकूर,डी.पी. हांडे इत्यादी 37 कवींनी चव आणि रंग चढविणार्‍या कविता सादर केल्या.

Exit mobile version