मध्यावधी निवडणुकीची शक्यता- उद्धव ठाकरे

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकांची शक्यता उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांच्या बैठकीत वर्तवली आहे. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना निडवणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश या बैठकीत दिले आहेत. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

दादर येथील शिवसेना भवनात राज्यातील सर्व संपर्कप्रमुखांच्या बैठक पार पडली. तयारीला लागा, मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात,कार्यकर्त्यांपर्यंत जा.. असे आदेश बोलताना उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना दिले आहेत. राज्यामध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मोठ मोठ्या घोषणा करायला सुरुवात केली आहे. राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागतील. आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहचला हवं. आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहचवा. राज्यात मध्यवधी निवडणुका लागतील, त्याला तयार राहा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना दिल्या आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी नवीन घोषणा केल्या आहेत. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असे मनिषा कायंदे म्हणाल्या.

Exit mobile version