इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर संभाव्य वाड्यांचे स्थलांतर

| रसायनी | वार्ताहर |

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीच्या दुर्घटने नंतर खालापूर तालुका पंचायत समितीने उप विभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी, महसूल व पोलिसांच्या मदतीने सात गावांचे तात्पुरते पुनर्वसन केल्याने संभाव्य धोके टाळण्याात आले आहेत.

ग्रामपंचायत चौक हद्दीतील दुर्घटना ग्रस्त इर्शाळवाडीचे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर डायमंड पम्प येथे कंटेनर हाऊस येथे करण्यात आले आहे. ग्रामविकास अधिकारी एस. पी. जाधव भ्रमण ध्वनी 9158579944, ग्रामपंचायत नारंगी दत्त वाडी यांना अनुभविक प्रशिक्षण संस्था नारंगी ग्रामसेवक गणेश मोरे भ्रमण ध्वनी 8605194104, ग्रामपंचायत बीड हद्दीतील आदिवासी व बौद्धवाडी यांचे स्थलांतर महड गणपती देवस्थान यांच्या भक्त निवासात, ग्रामसेवक महेश म्हसे भ्रमणध्वनी 8308695125, ग्रामपंचायत होनाड येथील चींचवली गोहे वाडीचे जिल्हा परिषद शाळा गोहे येथे ग्रामसेविका स्नेहल घोसाळकर भ्रमणध्वनी 9867381094, ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव येथील चांगेवाडी, गारभाट यांचे स्थलांतर आंबेवाडी शाळेत, तर धनगरवाडी, ताडवाडी यांचे स्थलांतर चिंचमाळ साई मंदिरात केले आहे, ग्रामसेवक कन्हैयालाल पाटील 9403652561, ग्रामपंचायत जांबरंग ठाकूरवाडी यांना प्राथमिक शाळा जांबरुंग ग्रामसेवक संतोष पवार भ्रमण ध्वनी 8275269723, ग्रामपंचायत नंदनपाडा येथील तोंडली या वाडीला जिल्हा परिषद शाळा येथे ग्रामसेवक वैभव पाटील भ्रमणध्वणी 9272480351, ग्रुप ग्रामपंचायत साजगाव येथील ढेकुजावईवाडी यांना ढेकु शाळेत, ग्रामविकास अधिकारी विनोद चांदोरकर भ्रणध्वनीक्रमांक 8805020911.

त्यांच्या राहण्याची सोय सर्व प्रकारचे सुविधा पुरविण्याचा सहित करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी राजपूत यांनी सांगितले आहे. त्यांचे नातेवाईक अगर अन्य मदत करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांनी वरील ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Exit mobile version