मध्य रेल्वेकडून पोस्टर मेकिंग स्पर्धा

| माथेरान | वार्ताहर |
मध्य रेल्वे मुंबई विभागाकडून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तसेच प्रवाशांमध्ये सुरक्षेनिमित्त जागरूकता निर्माण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून शक्कल लढवत पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. एक बाजूला येऊ नका.घाटसेक्शन मधील सुरक्षित प्रवास अशी थीम असणार आहे. 22 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान या 20.20 किलोमीटर नॅरोगेज मार्गावर मिनिट्रेन पर्यटकांच्या सेवेसाठी सुरू केली आहे.पहिल्या दिवशी पर्यटक प्रवाशांच्या प्रचंड प्रतिसाद लाभला असून आणखी पर्यटक या मिनिट्रेनकडे आकर्षित व्हावे.

तसेच काही पर्यटक प्रवासी हे आसनावरून उठून दरवाजात उभे राहतात किव्हा एका बाजूला झुकतात त्यामुळे ट्रेनच्या गुरुत्वाकर्षणाचे केंद्र बदलू शकते.त्यामुळे बोगीचा असमतोल होऊ शकतो.यासाठी मध्य रेल्वेने अनोखी शक्कल लढवली आहे.पर्यटक प्रवाश्यांनी जागेवर बसून निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यावा.रविवारी 23 ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा घेण्यात आली सकाळी 11 ते दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान ही स्पर्धा घेतली आहे. घाटसेक्शन मधील सुरक्षित प्रवासासाठी पर्यटक प्रवाश्यानी दरवाजाच्या एका बाजूला झुकू नये किंवा बोगीच्या एका बाजूला उभे राहू म्हणून पर्यटक प्रवाश्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश असल्याचे मध्य रेल्वेने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.त्यांनी हे सुद्धा नमूद केले आहे की ही एक टॉप्सी राईड असणार आहे.एका बाजूला झुकू नका असे यामधून संगितले जात आहे.

प्रत्येक पर्यटक प्रवाश्यानी आपल्या जागेवर बसूनच निसर्गाचा विस्मयकारक प्रवासाचा आनंद घ्यावा.प्रवाश्यांचे हे छोटे सहकार्य रेल्वेला घाटसेक्शनमधील 21 किलोमीटरचा निसर्गरम्य प्रवास आनंददायी आणि संस्मरणीय बनविण्यात मदत करेल.कागद आणि रंग रेल्वेकडून पुरवले आहे.

– शिवाजी सुतार,मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
Exit mobile version