। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी कौन्सिलने कपड्यांवरील जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. जीएसटी कौन्सिलने यापूर्वी कपड्यांवरील जीएसटी दर 5 टक्क्यांवरून 7 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक राज्ये आणि वस्त्रोद्योग संघटना हा निर्णय मागे घेण्याची मागणी करत होते.
जीएसटी मंडळ 1 जानेवारी, 2022 पासून, कापड उत्पादनांवर जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्के एवढी वाढ केली जाईल, असे निश्चित केले होते, पण राज्य सरकार आणि कापड उद्योग जीएसटी दर वाढीच्या विरोधात होते. त्यामुळे जीएसटी कौन्सिलच्या आजच्या बैठकीत कपड्यांवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यावर चर्चा होऊन जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला.