। महाड । प्रतिनिधी ।
वहूर गावानजीक शुक्रवारी (31 डिसेंबर) सकाळी 12 च्या सुमारास मिनीडोअर आणि बुलेट यांच्यात झालेल्या अपघातात बुलेटचालक ठार झाला. मात्र त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातात मिनीडोअर चालक इम्तियाज पटेल हा गंभीर जखमी झाला.
मिनीडोअर रिक्षा क्र. एमएच 06 जे 1503 व बुलेट बाईक क्र. एमएच 48 सीएफ 0799 रिक्षा ही महाड बाजूकडून मुंबईकडे जात होती तर बुलेट ही दुचाकी मोटार सायकल मुंबईकडून रत्नागिरीकडे जाताना हा अपघात झाला आहे. बुलेट ही दुचाकी मोटार सायकल अतिवेगात असल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात असून बुलेट चालकाचा महाडच्या ग्रामीण रुगणालयात मृत्यू झाला.