पुण्यातील मनसेच्या महाआरतीला स्थगिती

। पुणे । वृत्तसंस्था ।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर पुण्यातील मनसेच्या महाआरतीच्या आयोजनाला स्थगिती देण्यात आली आहे. खरंतर, मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीतर मनसेच्या प्रत्येक शाखेमध्ये हनुमान चालीसा लावून महाआरती करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला होता. पण राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर स्थानिक पातळीवर महाआरतीचा निर्णय स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.

मनसे आणि हिंदुत्ववादी संघटना उद्या अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर प्रत्येक शाखेमध्ये महाआरती करणार होते. पण उद्या ईद असल्यामुळे राज ठाकरे यांनी ४ तारखेपर्यंत भोंगे उतवरण्याचे अल्टीमेटम दिले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर मसने कार्यकर्त्यांनी उद्या ऐवजी ४ तारखेला महाआरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्याच्या आयोजनाला स्थगिती देण्यात आली आहे.

Exit mobile version