। मुंबई । वार्ताहर ।
गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्रच शोभायात्रा, मेळावे निघाले होते. त्यातच मनसेचाही पाडवा मेळावा निघाला होता. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदावरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली. तसेच मुंबईत आता मशिदीचे भोंगे वाजू देणार नाही अशीही भूमिका घेतली. त्यामुळे, राज ठाकरेंनी साधलेल्या निशाण्यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर देत मनसेच्या पाडवा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणावर तोडीस तोड उत्तर दिले. तसेच, बाळासाहेबांचे उत्तराधिकारी उध्दव ठाकरेच आहेत हे पुन्हा सिध्द झाले बाकी डुप्लिकेट लोकांचे काम नाही, असही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.