। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड शहरातील अंतर्गत रस्त्याकरिता शासनाकडून 5 कोटी निधी मंजूर झाले होते त्या अनुषंगाने नगरपरिषदेने शहरातील 9 ठिकाणी नव्याने रस्ताचे काम सुरू करण्यात आले.त्यापैकी दस्तुरीनाका ते जुनीपेठ या रस्त्यावरचे काम चालू करण्यात आले. रस्तावर डांबर टाकुन जी बारीक खड्डी टाकण्यात आली आहे.ही खड्डी सध्या मोटारसायकल वाहन-चालकांना धोकादायक बनली आहे.या रस्त्यावरुन प्रवास करताना मोटारसायकल वाहन-चालकांना जीव मुठीत घेऊन गाडी चालवावे लागत आहे.या खड्डीमुळे आता पर्यंत 2 जणांचा गाडी सील्प होवुन किरकोळ जखमी झाले आहेत.तसेच या खड्डीवरील धुळ ही वाहनचालकांसाठी त्रासदायक होत आहे. रस्त्यावरून ये-जा करणार्या वाहनांमुळे खड्डीवरील धुळ आता वातावरणात मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या प्रदूषणात रस्त्यावरील तसेच रस्त्यालगत असलेला कचराही हवेत मिसळत आहे. परिणामी ही प्रदूषित हवा श्वसनावाटे वाहतूकदारांच्या शरीरात जात आहे.तसेच रस्त्यालगत असणा-या नागरिकांना ही यांचा त्रास होवु लागला आहे.तरी ठेकेदारांनी ताबडतोब रस्तावरील पडलेली खड्डी रोलरनी चेपावी जेणेकरून वाहनचालकांना त्रास होणार नाही. अशी मागणी स्थानिक नागरिक व मोटारसायकल वाहनचालक करत आहेत.