रेवदंडा बस स्थानक खड्ड्यात

| रेवदंडा | वार्ताहर |

रेवदंडा बस स्थानक परिसरात खड्डे पडले असून या खड्ड्यांची खोली व रूंदी फारच मोठी असल्याने लहान मोठी वाहने तसेच प्रवासीवर्गाना जा-ये करणे धोकादायक ठरते. अलिबाग व मुरूड आगारातून येत असलेल्या एस.टी बसेसना सुध्दा या खड्ड्यातून मार्गक्रमण करावे लागते. पावसाचे तुंडूब पाणी या खड्ड्यात भरले जाते, त्यामुळे बसस्थानकांच्या परिसरात या खड्ड्यांने तलाव निर्माण केला आहे. तसेच खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने छोटी मोठी वाहने तसेच एस.टी. बसेस जोरदारपणे आपटले जातात व आतील प्रवाशांना धक्का सहन करावा लागतो.

सध्या गणेशोत्सव नजीकच आल्याने प्रवासी एस.टी. बसेसची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे साहजीकच येथे एस.टी.बसेसची रेलचेल वाढणार आहे. तसेच ऐन गणेशौत्सव कालावधीत प्रवासीवर्ग सुध्दा मोठया संख्येने येथून जा-ये करणार आहे, तेव्हा रेवदंडा बस स्थानक परिसरातील खड्डा भरण्यात यावे, तसेच बस स्थानक परिसर नव्याने नुतनीकरण व दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रवासीवर्ग करत आहेत.

Exit mobile version