बेरोजगारांना पोल्ट्री व्यवसायाचा आधार

जिल्ह्यात 75 हजार पेक्षा अधिक तरुण बेरोजगार; पशुसंवर्धन विभागाकडून अनुदान

। अलिबाग । प्रतिनिधी ।

औद्योगिकिकरण वाढत असताना जिल्ह्यात आजही 75 हजार पेक्षा अधिक तरुण बेरोजगार आहेत. नोकरी नसल्याने लहान उद्योग सुरु करण्याच्या तयारीत असलेल्या या बेरोजगारांना आर्थिक बळ देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने नाविन्यपुर्ण योजना सुरु केली आहे. पोल्ट्री व्यवयातून बेरोजगारांना उभारी मिळावी यासाठी एक हजार बॉयलर पक्षांच्या शेडसाठी पशुसंवर्धन विभागाकडून अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. या व्यवसायातून बेरोजागांरांना व्यवसायाचा अधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

रायगड हा पर्यटन औद्योगिकीकरणाच्यादृष्टीने महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. शनिवार व रविवार अन्य सुट्टीच्या दिवशी पर्यटक पर्यटनस्थळी फिरण्यास येतात. परंतू या पर्यटनावर अधारित लहान व्यवसायिकांना यातून उत्पन्नाचे साधन मिळण्यास अडथळे निर्माण होत आहे. तसेच औद्योगिक जिल्हा असला तरी देखील रोजगाराचे साधन मिळविण्यासाठी जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील निम्म्याहून अधिक तरुण रोजगारासाठी मुंबई, पुणे या ठिकाणी जातात. मुंबई, पुणे या ठिकाणी रोजगाराची संधी शोधण्यासाठी जातात. रायगड जिल्हयाच्या अगदी जवळ ही दोन शहरे असल्याने जिल्हयातील तरुणांना रोजगारासाठी या ठिकाणी जाणे शक्य होते. परंतु वाढती महागाई, वाढते घरभाडे अशा अनेक कारणांमुळे काही तरुणांना माघारी येण्याची वेळ येते. कोरोनाच्या कालावधीत केलेल्या लॉकडाऊनचा फटका अनेक तरुणांना बसला आहे. यातून अजूनही काही तरुण सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावांमध्ये अथवा अन्य ठिकाणी लहानसा व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करतात. परंतू भांडवल नसल्याने व्यवसाय उभे करण्यास अडथळे  निर्माण होत आहेत. त्यात बँकांकडून कर्जही मिळत नाही, अशी ओरड बेरोजगारांची आहे.  मात्र पशुसंवर्धन विभागाने बेरोजगारांना पोल्ट्री व्यवसायातून रोजगार देण्यासाठी नाविन्यपुर्ण योजना सुरु केली आहे.

बॉयलर पक्षांसाठी उभारण्यात येणार्‍या शेड उभारणीसाठी मागासवर्गीय घटकातील बेरोजगारांना 1 लाख 12 लाख 500 रुपये व सर्व साधारण घटकातील बेरोजगारांना 1 लाख 68 हजार रुपयांचे अनुदान मिळत आहे. जानेवारी महिन्यात या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज भरणे, अंतिम निवड करणे अशी प्रक्रीया पुर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी तरुणाई पुढाकार घेत आहेत.

अनुदानासाठी पहावी लागते वाट
पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत  बॉयलर पक्षांच्या शेडसाठी अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना बेरोजगारांना अधार ठरत असली तरीही दुसर्‍या बाजुला या योजनेला प्रतिसाद अल्प असल्याचे समोर येत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यापासून योजनेचा लाभ मिळविण्यापर्यंत लाभार्थ्यांना स्वतःचे पैसे खर्च करावे लागतात. मात्र इतके पैसे नसल्याने अनेक तरुण ही योजना करण्यास माघार घेत आहेत. शेडचे अनुदान पुर्ण काम केल्यावर बिल पशुसंवर्धन विभागाला दिल्यानंतर. तसेच त्या विभागातून पडताळणी झाल्यानंतर अनुदानासाठी वाट पहावी लागत असल्याने लाभार्थी या योजनेकडे जास्त लक्ष देत नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून उपलब्ध झाली आहे.

Exit mobile version