कुक्कुट, शेळीपालन शेतीला उत्तम जोडधंदा; तालुका कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन

। पाताळगंगा । वार्ताहर ।
शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुट आणि शेळीपालन अत्यंत महत्त्वाचे असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकतो, शिवाय यांच्या विष्ठा, मूत्र शेतीसाठी सेंद्रिय खत म्हणून वापरले जाते. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आदिम जमाती संवर्धन व विकास कार्यक्रमांतर्गत शेळी, कुक्कुट पालन व व्यवस्थापन या विषयाचे प्रशिक्षण तालुका कृषी अधिकारी, खालापूर यांच्यामार्फत रामेती खोपोली येथे घेण्यात आले. यावेळी प्रशिक्षण घेतल्यांचे प्रमाणपत्र देण्यात आले.
या प्रशिक्षणास विभागीय कृषी सहसंचालक फलोत्पादन कृषी आयुक्तालय पुणे अशोक किरन्नळी, उपविभागीय कृषी अधिकारी खोपोली, बालाजी ताटे, तालुका कृषी अधिकारी खालापूर अर्चना सूळ-नारनवर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या कार्यालयमार्फत कैलास चव्हाण, प्रभारी आदिवासी विकास निरीक्षक खालापूर निलेश सोनावणे, प्रशिक्षक पशुधन विकास अधिकारी चौक डॉ. मुकेश मर्चन्ड, प्रशिक्षक रायगड पशु अहार कंपनी चेअरमन विक्रांत जाधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन आत्मा बी.टी. एम. प्रज्ञा पाटील यांनी केले होते. प्रशिक्षणास मंडळ कृषी अधिकारी जे.के. देशमुख, कृषी पर्यवेक्षक धुमाळ व श्री. शिंदे तसेच कार्यालयातील सर्व कृषी सहाय्यक यांनी सहकार्य केले.

Exit mobile version