श्रीवर्धन तालुक्यात वीजेचा लपंडाव सुरू

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यात सध्या विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दर 10 ते 12 दिवसांनी दुरूस्ती व देखभालीसाठी संपूर्ण दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. या व्यतिरिक्तअनेक वेळा कोणत्याही प्रकारचे वादळ किंवा अतिवृष्टी नसतानाही वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही दिवसात गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे मूर्तिकारांची मूर्ती रंगवण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र संपूर्ण दिवसभर वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे त्यांच्या कामातही व्यत्यय निर्माण होत आहे.

वारंवार देखभाल व दुरुस्तीची कामे केली जात असताना सतत वीज पुरवठा खंडित का होतो? याबाबत वीज ग्राहकांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. गणोत्सवात वारंवार वीज पुरवठा खंडित होत राहिला, तर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महावितरणाच्या अधिकार्‍यांनी तातडीने लक्ष घालून वीज पुरवठा खंडित होणार नाही. याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.

Exit mobile version