• Login
Saturday, March 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वीज तोडली, शिक्षण अडलं

Krushival by Krushival
September 29, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
‘इथे’ साडेचार कोटींची महावितरणची थकबाकी
0
SHARES
63
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

49 शाळांना शॉक देण्याची महावितरणची तयारी; ग्रामपंचायतींच्या बेफिकरीचा विद्यार्थ्यांना फटका

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

अलिबाग तालुक्यातील 54 शाळांचे सुमारे दोन लाख 75 हजार रुपयांचे वीज बिल थकले आहे. महावितरणने कारवाईचा बडगा उगारत पाच शाळांचे वीज कनेक्शन तोडले आहे. सध्या या शाळा अंधारात असून, अन्य 49 शाळांना शॉक देण्याची तयारी महावितरणने केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात राहण्याची भीती निर्माण झाली आहे. याकडे जिल्हा परिषद, शिक्षण विभाग गांभीर्याने लक्ष देईल का, हा खरा प्रश्‍न आहे. मागील काही महिन्यांपूर्वीदेखील वीज बिल न भरल्याने शाळा अंधारात राहिल्याच्या घटना घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा ग्रामपंचायतींच्या बेफिकरीमुळे शाळांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागणार असल्याचे चित्र आहे.


अलिबाग तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 169 शाळा असून, या शाळांमध्ये सुमारे सहा हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांपैकी तालुक्यातील 54 शाळांमधील वीज बिल गेल्या काही महिन्यांपासून थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. 970 रुपयांपासून 17 हजार रुपयांपर्यंत बिल शाळांनी भरले नसल्याची माहिती आकडेवारीनुसार स्पष्ट झाली आहे. या 54 शाळांमध्ये सुमारे एक हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वीज बिल थकीत असल्याने महावितरण विभागाने कारवाई करण्यासदेखील सुरुवात केली आहे. त्यामध्ये तालुक्यातील नागझरी, भोमोली, डांगी, कुदे, सागरगड येथील शाळांचे वीज कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे या शाळा अंधारात असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळांमध्ये पुरेसे प्रकाश नसल्याने विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षकांना अडचण येत आहे.

संयुक्त शाळा अनुदानाची प्रतीक्षा
जिल्हा परिषद शाळांच्या किरकोळ खर्चासाठी संयुक्त शाळा अनुदान शासनाकडून वर्ग केला जातो. शाळेतील पटसंख्येनुसार हा निधी वर्ग केला जातो. त्यामध्ये 30 पटसंख्या असलेल्या शाळांना दहा हजार रुपये 60 पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांना 25 हजार रुपये, त्यापेक्षा अधिक असलेल्या शाळांना 50 हजार व 75 हजार व एक लाख रुपये असे अनुदान जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून वर्ग केले जाते. परंतु, हे अनुदानच शाळांपर्यंत पोहोचले नसल्याची माहिती समोर येत आहे. शाळांचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याचा फटका शाळांना बसत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या या कारभारामुळे अनेक शाळा अंधारात राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामपंचायतींकडूनही बिल भरण्यास टाळाटाळ
जिल्हा परिषद शाळांना निधी पुरेसा मिळत नसल्याने ग्रामपंचायतींनी त्यांच्या उत्पन्नातून खर्च करून शाळांचे बिल भरण्याचे पत्र मागील काही वर्षांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते. काही ग्रामपंचायती त्याची अंमलबजावणी करीत आहेत. परंतु, काही ग्रामपंचायती निधी नसल्याचे कारण सांगून बिल भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शाळेतील मुख्याध्यापकांंकडून केला जात आहे.
विजेअभावी डिजिटल शिक्षण मोबाईलद्वारे
कुदे येथील जिल्हा परिषद शाळेतील वीज मीटर फॉल्टी असल्याने बिल भरमसाठ आले. त्यामुळे 17 हजारांहून अधिक बिल थकीत असल्याचे सांगण्यात आले आहे. वीज बिल न भरल्याने शाळा अंधारात असून, विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मोबाईलद्वारे दिले जात आहे. शासनाकडून अनुदान कमी येत असल्याने भौतिक सुविधांसह वीज बिल भरणे परवडत नाही. त्यामुळे वीज बिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असून, याबाबत ग्रामपंचायतीला शाळेने पत्र दिले आहे, अशी माहिती शाळेकडून देण्यात आली आहे.

मीटर फॉल्टी असल्याने वीज बिल भरमसाठ आले. मीटर काढून नेण्यात आले आहे. बिल थकीत असल्याचे पत्र शिक्षण विभागाला व ग्रामपंचायतीला दिले आहे.

रुपाली माळी,
मुख्याध्यापिका, कुदे जिल्हा परिषद शाळा

15 वित्त आयोगातून शाळेतील बिलाचे नियोजन केेले जात आहे. कुदे शाळेतील बिल कार्यालयात आले नाही. बिल मागील अनेक महिन्यांपासून थकीत आहे. त्याची पाहणी करून आराखड्यानुसार बिल भरण्याची तयारी केली जाईल.

दर्शन धुमाळ,
ग्रामसेवक, सुडकोली ग्रामपंचायत

Related

Tags: alibag newsElectricity bills of schools are exhaustedindiakrushival mobile appmaharashtramahavitran newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocia newssocial media news
Previous Post

नेरळमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

Next Post

बारामती हादरली! बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या

Krushival

Krushival

Related Posts

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके
sliderhome

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके

March 13, 2026
आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच
sliderhome

आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच

March 13, 2026
गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ
sliderhome

गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ

March 13, 2026
मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण
sliderhome

मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण

March 13, 2026
दादरचे शेतकरी एकवटले
sliderhome

दादरचे शेतकरी एकवटले

March 13, 2026
क्रीडा

आई एकविरा चषकाचा थरार

March 13, 2026
Next Post
धक्कादायक हत्या; पत्नी आणि मुलीचा चिरला गळा

बारामती हादरली! बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?