पाभरे ते श्रीवर्धन दरम्यान विद्युत वाहिनीमध्ये बिघाड

सोमवारी वीजपुरवठा खंडित राहणार; महावितरणतर्फे सूचना जाहीर
। अलिबाग । वार्ताहर ।
पाभरे ते श्रीवर्धन दरम्यान 22 केव्ही विद्युत वाहिनी मध्ये बिगाड झाला असल्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्याकरिता सोमवार दिनांक 20 जुन 2022 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत श्रीवर्धन उपकेंद्राचा विद्युत पुरवठा खंडीत होणार असल्याची सूचना महावितरण तर्फे देण्यात आली आहे.

त्यामुळे श्रीवर्धन तालुक्याअंर्तगत श्रीवर्धन शहर, मेटकर्णी, आराठी, खेर्डी, चिखलप, हुनवेली, वाळवटी, आरावी, शेखाडी, गोठण, भरडोली, मेघरे, मामवली, बापवली, कासारकोंड, पुनीर, भोस्ते, वडघर, पांगळेली, जांभूळ, गाणी, जसवली, रानवली, गालसुरे, निगडी, कोलमांडला, सायगाव, काळींजे, कुरुवडे, मारळ, हरेश्वर, भेंडेखोल, बागमांडला व इतर आजूबाजूची छोटी गावे यांचा विज पुरवठा वरील कालावधीत बंद राहणार आहे. याची सर्व वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी. कामाच्या गरजे नुसार वेळेत थोडफार बदल होऊ शकतो अशी सूचना महावितरण, श्रीवर्धनचे उपकार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.

Exit mobile version