आंबेवाडी येथे विद्युत समस्या गंभीर


महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिले निवेदन
। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील आंबेवाडी येथील रहिवासी वर्गाला भेडसावत असलेल्या विद्युत समस्यांबाबत तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोलाड राज्य विद्युत वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले आहे.

दिवसेंदिवस कोलाड-आंबेवाडी-वरसगाव नाक्याचे नागरिकीकरण व शहरीकरण वाढत चालले असल्याने विद्युत समस्यांचाही सामना येथील रहिवासी वर्गाला करावा लागत आहे. वाढत्या विद्युत समस्यांबाबत विद्युत मंडळाचे कर्मचारी देखील त्वरीत निराकरण करून दखलही घेत आहेत. परंतू वाढत्या शहरीकरणामुळे समस्याही उद्धभवत असताना त्याचा त्रास मात्र येथील रहिवासी वर्गाला सोसावा लागत आहे.

दरम्यान या समस्यांबाबत तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला अध्यक्षा प्रितम पाटील यांनी उपअभियंता महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नितिन जोशी यांना याबाबत निवेदन देऊन त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यावेळी.पं.सदस्य कुमार लोखंडे, अविनाश पलंगे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version