Maharashtra Political Crisis: आता कायदेशीर लढाई रंगणार

। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आजचा चौथा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. एकनाथ शिंदे गट त्यांच्या मागण्यांवर ठाम आहे, तर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना मुंबईत येऊन बोलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या आवाहनला एकनाथ शिंदेंनी नाकारलं आहे. तसेच, कालपासून शिवसेनेतील आणखी काही आमदार शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे सध्या शिंदे गटात ४० शिवसेना आमदार असल्याची माहिती आहे.

Exit mobile version