महाड शहराचा वीज पुरवठा पुर्ववत सुरु

| महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती मुळे अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचे मनोरे कोसळले होते.त्या मुळे येथील उप केद्राचा वीज पुरवठा खंडीत झाला होता.यामुळे महाड शहर आणि परिसर पुर्णपणे अंधारा मध्ये होते.परंतु अथक मेहनत करुन वीज वितरण वैंपनीच्या अधिकाछयांनी,कर्मचाछयांनी सावित्री नदी पात्रांतुन वीजेच्या तारा टाकुन शहराचा वीज पुरवठा सुरु करण्यांत यश मिळविले.कर्मचाछयांनी अहोरात्र मेहनत करुन वीज प्रवाह सुरु केल्या बद्दल महाड तालुक्यांतुन त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शहराचा वीज पुरवठा सुरक्षितेच्या कारणावरुन बंद करण्यांत आला होता.शहरांमध्ये वीज पुरवठा नसल्याने अनेक अडचणीना नागरिकांना सामोरे जावे लागत होते.प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिक हवालदिल झाले,परंतु सातत्याने कोसळणारा पाऊन आणि पुरां नंतर सर्वत्र झालेला चिखल यांतुन काम करणे अवघड होते.परंतु वितरण वैंपनीच्या कर्मचार्‍यांनी अत्यंत अवघड परिस्थितीतुन तब्बल नऊ दिवस प्रयत्न करुन वीज पुरवठा सुरु करण्यांत यश मिळविले.

वीज पुरवठा नसल्याने मोबाईल बंद,नेटवर्क देखिल बंद यामुळे संपर्वै साधणे अवघड झालेले असताना वीज कर्मचारी काम करीत होते.अत्यंत प्रतिकुल परिस्थिती मध्ये दोन कोसळलेले उंच मनोरे उभे करण्यांत आले.220 केच्ही महाड उप केंद्राचा वीज पुरवठा सुरु करण्यात आला.हा पुरवठा सुरु करण्यासाठी सावित्री नदीच्या जोराने वाहाणार्‍या प्रवाहाशी सामाना करावा लागला,वाहात्या पाण्यांतुन पलिकडे वीजेच्या तारा नेण्यासाठी सहा तास कसरत करावी लागली.या करीता कोलाडच्या रिव्हर फायटींग पथकाच्या होडीची मदत घ्यावी लागली.त्याच बरोबर महाड नगरपालिका,ग्रामस्थांच्या मदतीने वीजेच्या तारा पलिकडच्या किनार्‍या पर्यत पोहोचविण्यात यश आले.तारा वीजेच्या खांबाना जोडण्यांत आल्या नंतर शहराचा वीज पुरवठा सुरु करण्यांत यश आले.वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Exit mobile version