रायगडची पॉवरलिफ्टर अफ्रिकेला रवाना

| कर्जत | वार्ताहर |

साऊथ आफ्रिका येथे दि. 5 ते 13 जुलै दरम्यान होणाऱ्या आशिया पॅसिफिक आफ्रिकन सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनिअर, मास्टर्स क्लासिक आणि इक्विपड पॉवर लिफ्टींग व बेंचप्रेस स्पर्धेसाठी कर्जत तालुक्यातील शेलु वांगणीची रहिवासी पॉवरलिफ्टर अमृता माधुरी ज्ञानेश्वर भगत हीची निवड भारतीय संघात झाली असून 13 जुलै रोजी होणाऱ्या ज्युनिअर इक्विपड स्पर्धेत 47 कीलो गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. 2023 मध्ये रोमानिया येथे झालेल्या स्पर्धेत सुद्धा उत्कृष्ट कामगिरी करत तिने रौप्य पदक प्राप्त केले होते. अमृताने कबड्डी खेळाबरोबरच पॉवरलिफ्टिंग खेळाची आवड जोपासली आहे.

अमृता भगतची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून या स्पर्धेत ती भारतासाठी पदक प्राप्त करेल असा विश्वास पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक, सहसचिव सचिन भालेराव, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर, खजिनदार राहुल गजरमल आणि सचिव अरुण पाटकर यांनी केला आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके प्राप्त केलेली अमृता माधुरी ज्ञानेश्वर भगत ही खेळाडू पदकाची परंपरा कायम राखेल, असा विश्वास रायगडचे ज्येष्ठ राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग खेळाडू माधव गोविंद पंडित यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version