अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जागतिक मघूमेह जागृती सेवा सप्ताह निमित्त लायन्स क्लब आँफ अलिबाग,मांडवा, पोयनाड, अलिबाग डायमंड,लिओ क्लब अलिबाग यांच्यावतीने ह्यांनी अलिबाग समुद्र किनारा ते आंबेडकर पुतळा व शिवाजी महाराज पुतळया जवळुन परत समुद्र किनारा अशी रँली काढण्यात आली.महाभयंकर अश्या डायबेटीस रोग नियंत्रणात येण्या साठी जनजागृती पर फलक, माहिती, घोषणा देण्यात आल्या.
आजच्या ह्या रँली सोबत आरसीएफ च्या सीआयएसएफ च्या जवानांचा देखील सहभाग होता. ह्या रँली साठी नितीन अधिकारी, अरविंद घरत, धवल राऊत, अध्यक्ष मोहन पाटील, उपाध्यक्ष बाळकृष्ण कोळी, खजिनदार आजय आंगणे तसेच डॉ. राजेंद्र मोकल, डॉ. राजाराम हुलवान, सुमित पाटील, चंद्रकांत मल्हार, हेमा घरत, सविता साळशिंगेकर ह्या सर्व लायन मेंबसनी उपस्थित राऊन सहकार्य केले.