प्रभाविष्काराचा उद्या अंतिम सोहळा

अमोल कोल्हेंसह विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती


| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील पीएनपी शैक्षणिक संकुलाद्वारे ‌‘प्रभाविष्काराचा’ अंतिम सांस्कृतिक सोहळा 23 डिसेंबरला मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा ठाव घेऊन त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेणारा व सर्वांगीण विकासाला वाव देणाऱ्या कार्यक्रमात मराठीतील एक अभिनेते व राजकारणी खासदार अमोल कोल्हे व पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, यांची उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता सुरु होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

बुधवार 20 डिसेंबरला पहिल्या दिवशी सीबीएसई होली चाईल्ड शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम, 21 डिसेंबरला स्टेट बोर्ड होली चाईल्ड स्कूल, 22 डिसेंबरला प्राथमिक, माध्यमिक मराठी शाळा व बीएड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शनिवारी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत. या निमित्ताने शेवटच्या दिवशी महागरब्याचे आयोजन केले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘राजा शिवछत्रपती’तसेच झी मराठी वाहिनीवरील’स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेते कोल्हे या कार्यक्रमासाठी आकर्षण ठरणार आहेत. या सोहळ्यास टीव्ही मालिकांमधील कलाकार उपस्थित राहणार आहेत. भव्यदिव्य स्वरुपात होणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version