। अलिबाग । प्रतिनिधी ।
पीएनपी वेश्वी शैक्षणिक संकुलाद्वारे प्रभाविष्कार या सांस्कृतिक सोहळ्याचे 19 ते 23 डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आलेले आहे. दि. 23 डिसेंबरला स्वराज्य रक्षक या गाजलेल्या सोनी टीव्ही मालिकेतील छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका करणारे अभिनेते,खा.डॉ.अमोल कोल्हे यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थित असणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम पीएनपी संकूल,वेश्वी येथे होणार आहे.
सोमवारी (19 डिसेंबर) सायंकाळी 5 ते 9 या वेळेत होली चाईल्ड इंग्रजी माध्यम विविध गुणदर्शन कार्यक्रम तर 20 डिसेंबरला होली चाईल्ड सीबीएसई स्कूल सायंकाळी 5 ते 9 या वेळेत, 21 डिसेंबर रोजी प्राथमिक व माध्यमिक शाळा वेश्वी ( मराठी माध्यम ) सायंकाळी 5 ते 9 या वेळेत, 22 डिसेंबर रोजी कनिष्ठ महाविद्यालय वेश्वी सायंकाळी 5 ते 9 या वेळेत तर 23 डिसेंबर रोजी वरिष्ठ महाविद्यालय 5 ते 9 या दरम्यान विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि 9 ते 10 यावेळेत महागरबाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सर्व कार्यक्रम पीएनपी संकुलात सादर होणार असून सर्वांना प्रवेश विनामूल्य असणार आहे. या सोहळ्यास टीव्ही मालिकांमधील कलाकार उपस्थित राहणार आहेत. भव्यदिव्य स्वरुपात होणार्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे पीएनपी संकुलाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.