। अलिबाग । वार्ताहर ।
महाराष्ट्र नरबळी, इतर अमानुष व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याकरिता तसेच त्यांचे समूळ उच्चाटण अधिनियम-2013 जारी केला आहे. या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली. या क्षेत्रात कार्यरत असणार्या व्यक्तींनी समन्वयक म्हणून काम करण्यासाठी दि.20 डिसेंबर पर्यंत केलेल्या कार्याच्या पुराव्यासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कच्छि भवन, नमिनाथ जैन मंदिर, सेंट मेरी स्कूल समोर, श्रीबाग रोड, अलिबाग येथे अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.