पीपल्स चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रबोधन शिबीर

| वावोशी | वार्ताहर |

द पीपल्स वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्टच्या पुणे शाखेच्यावतीने एकदिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पुण्यातील मराठा चेंबर्स हॉलमध्ये करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरात नेतृत्व आणि संघटन कौशल्य या विषयावर यश क्लासचे संचालक प्रवीण बागुल यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी राजेंद्र वाघमारे, राजू कदम, राजाराम मोरे बाबुराव बनसोडे , भंते आधिचित्तो, मुकेश सताने, चंद्रकांत काळे , बाळासाहेब ननावरे, सचिन मोरे, रायगड जिल्हा प्रतिनिधी जतीन मोरे आणि त्यांचे सहकारी.पुणे जिल्हाप्रमुख शिवाजी वाघमारे, बाबासाहेब दहिभाते, सोलापूर जिल्हा प्रमुख यु व्ही जानराव आणि त्यांचे सहकारी, सचिन ननावरे, विशाल खुणे, राहुल बनसोडे, महेश गायकवाड, रामदास चौरे, महादेव बनसोडे, कुमार साबळे, बाबासाहेब बनसोडे, महेंद्र आव्हाड, नरहरी भोसले, मुकुंद गायकवाड, विश्‍वास वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version