| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा येथील वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बँरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभागांतर्गत महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलालाही वळण लावणारे रायगड जिल्ह्याचे सुपुत्र कै. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दिगंबर टेकळे यांनी भुषविले. तर अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.शिरीष समेळ यांनी प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. महाविद्यालयातील ग्रंथपाल आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.आर.एस.माशाले यांनी प्रबोधनकारांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करताना कै.केशवराव ठाकरे यांना प्रबोधनकार ही उपाधी कशी मिळाली याबाबतीत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील एन.एस.एस.आणि डि.एल.ई.विभागाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.







