प्रफुल भोसलेंच्या प्रचाराचा धडाका

उच्च विद्या विभूषित उमेदवार रिंगणात

। पनवेल । वार्ताहर ।

नागरिकांच्या हक्कासाठी लढून आपले वचन पूर्ण करण्याची उमेद बाळगून उच्च विद्या विभूषित प्रफुल्ल भोसले हे 33 मावळ लोकसभेच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. त्यांच्या या प्रचारातील त्यांचे मुद्दे, वचननाम्यात त्यांनी दिलेली वचने नागरिकांच्या चागलेच पसंतीस उतरताना दिसत आहेत. त्यांनी घेतलेल्या कॉर्नर सभांमध्ये नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी प्रफुल भोसले यांनी देशाचे नेतृत्व करण्यासाठी उच्च विद्या विभूषित खासदारांची गरज किती महत्वाची आहे, हा अजेंडा सर्वसामान्य नागरिकांसमोर ठेवून त्यांनी येत्या 13 मे रोजी मावळ लोकसभेच्या होणार्‍या निवडणुकांमध्ये नागरिकांना एक संधी देण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version